शिवसेना पक्षात महिलांचे प्रतिनिधित्व दिवसेंदिवस वाढत असून, नुकताच २६०० हून अधिक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्व महिलांचे सशक्तीकरण व कल्याण करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेच्या दृष्टीकोनाने प्रेरित होऊन झाल्याचे दिसून येत आहे.
लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी महाराष्ट्रातील माता आणि बहिणींच्या सक्षमीकरणावर केंद्रित आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षेचे लाभ, तसेच विविध विकासात्मक कार्यक्रमांचे लाभ मिळण्यास प्रोत्साहन दिले जाते.
शिवसेनेचा महिला वर्गात वाढता आधार शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाने महिलांना सशक्त करण्याचे काम सातत्याने केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकर्षण वाढले आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील महिलांना भविष्याची नवी दिशा मिळत असून, पक्षाचा महिला वर्गातील आधार मजबूत होत आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील विविध भागातील महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
ठाणे,पालघर , उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या विभागात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय होती.