शांतिनिकेतन विद्यालय मध्ये शालेय बचत बँक शाखेचे उदघाटन

Sep 2, 2024 - 21:49
 0
शांतिनिकेतन विद्यालय मध्ये शालेय बचत बँक शाखेचे उदघाटन

(लोकसवाल न्यूज नेटवर्क फुलंब्री)

 फुलंब्री .  दि- 2 सप्टेंबर 2024 रोजी फुलंब्री येथील शांतिनिकेतन विद्यालय मध्ये शालेय बचत बँक शाखेचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बँकेसंबंधी सर्व प्रकारच्या व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच पैसे बचत, त्यावरील व्याज दर समजणे हे महत्वाचे असल्यामुळे विद्यालयाने हा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या बचत बँकेत आपले खाते उघडून या उपक्रमाची जोरदार सुरुवात केली आहे. दैनंदिन जीवनातील थोडी थोडी बचत भविष्यात एक मोठा मोबदला देऊन जाते, हीच भावना विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शाळेने हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री पवार सर, यांच्या हस्ते बँकेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सोबत उपमुख्यध्यापक श्री गोर्डे सर, पर्यवेक्षक श्री जाधव सर, पर्यवेक्षिका सौ मंजुश्री मिस. श्री बोरसे सर तसेच इतर शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते.