शांतिनिकेतन विद्यालय मध्ये कला उत्सव 2024-25 चे आयोजन*

Sep 25, 2024 - 13:29
 0
शांतिनिकेतन विद्यालय मध्ये कला उत्सव 2024-25 चे आयोजन*

(लोकसवाल न्यूज फुलंब्री )

फुलंब्री येथील शांतिनिकेतन विद्यालय मध्ये कला उत्सव 2024-25 मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, या उत्सवात गायन,वादन, समूहगीत,एकपात्री अभिनय, लोकनृत्य, लोकगीत, गोष्ट वाचन, कथाकथन,चित्रकला, शिल्पकला या विविध स्पर्धेचा समावेश असून, तालुक्यातील विविध शालेय विद्यार्थ्यांनी या उत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे अप्रतिम सादरीकरण करून सर्वांची वाह वाह मिळवली.या उत्सवात शांतिनिकेतन च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन नामांकन मिळविले आहे.त्यामध्ये वैयक्तिक नृत्य -प्रथमस मूहनृत्य -द्वितीय गोष्टवाचन- प्रथम समूहगायन-द्वितीयचित्रकला -प्रथम व द्वितीय असे नामांकन विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल  शांतीनिकेतन विद्यालयाच्या अध्यक्षा सौ.अनुराधा ताई चव्हाण,मुख्यध्यापक श्री.पवार सर, उपमुख्यध्यापक श्री.गोर्डे सर पर्यवेक्षक श्री.जाधव सर पर्यवेक्षिका सौ. मंजुश्री मिस बोरसे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या