शफेपुर येथील उपकेंद्र पुन्हा सुरू करा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक उपअध्यक्षांची मागणी

Aug 18, 2024 - 16:08
 0
शफेपुर येथील उपकेंद्र पुन्हा सुरू करा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक उपअध्यक्षांची मागणी

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील शफेपुर या गावातील उपकेंद्र सुरू करा असं काँग्रेस जिला कमिटी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष यांनी निवेदन सादर केलेले आहे. शफेपुर येथील उपकेंद्र बऱ्याच काळापासून बंद आहे. तसेच गावातील गरोदर महिलांना लसीकरणाचे कार्य या उपकेंद्रात व्हावे अशी मागणी आहे. परंतु सदरील उपकेंद्र बंद असल्याकारणाने गरोदर महिलांचे लसीकरण हे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना व महिलांना याचा संपूर्ण फायदा मिळत नाही, यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद अली लियाकत अली यांनी हा उपकेंद्र पुन्हा सुरू करावे यासाठी गांभीर्य मागणी केलेली आहे. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. 

Loksawal News Loksawal Large Marathi news Network