लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत- रामदास आठवले

Jul 11, 2024 - 18:17
 0
लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत- रामदास आठवले
लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत- रामदास आठवले

मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले कि,  माझ्या पक्षाचा एकही खासदार नसतांना मोदींनी माझ्यावर तिसऱ्यांदा मंत्री पदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल त्यांचे आभार. रिपब्लिकन पक्ष जरी छोटा असला, तरी तो इतर पक्षांना मोठा करणारा पक्ष आहे . आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे पूर्ण करणार, आणि 2029 लाही पुन्हा महायुतीचं सरकार येणारं याची आम्हाला खात्री. एकट्या मोदींना हरवण्यासाठी सर्व नेते एकत्र आले, तरीसुद्धा ते मोदींना हरवू शकले नाहीत . भाजपला ज्या 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला जेवढ्या जागा तीन वेळेस मिळाल्या त्यापेक्षाही या अधिक आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात 200 पेक्षा कमी जागा असतानाही काँग्रेसने दहा वर्षे सरकार चालवलं. असे हि ते म्हणाले.

काही जण फुटतील अशा अफवा पसरवल्या जात आहेत, आमचे सरकार पाच वर्षे टिकेल. हाथरस घटनेनंतर मी त्या ठिकाणी भेट दिली, अंधश्रद्धेतून आयोजित केलेल्या सत्संगामध्ये 121 जण मृत्युमुखी पडले, यायचे 121 कुटुंबातील एकाला नोकरी मिळावी यासाठी योग्य आदित्यनाथ यांना पत्र लिहिणार. लोकसभेत आरपीआयला दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती, पण एकही जागा मिळाली मिळाली नाही. तरी नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आहेत.

एक MLC पद मिळावं, एक मंत्रिपद मिळावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, MLC आम्हाला मिळाली नाही, पण मंत्रिपद तरी मिळावं अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मी चाळीस-पन्नास जागा मागणार नाही, पण आरपीआयला 10-12 तरी जागा मिळाव्यात. येणाऱ्या विधानसभेत आम्हाला 288 पैकी 170 ते 180 जागा मिळतील, संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही.

मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर मी सहमत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा आमच्या सूचना आहेत.  दिल्लीला आमच्या मंत्रालयाकडे मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आला, तर त्याचा आमचा मंत्रालय नक्की विचार करेल. आरक्षणासाठी उत्पन्नाचा आठ लाखांचा निकष बारा लाख करावा असा आमचा प्रयत्न आहे.

ऑन पूजा खेडकर
पूजा खेडेकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा उचलला असेल तर ते अत्यंत गैर आहे. याची चौकशी झाली पाहिजे, आणि ह्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे. 

ऑन वाघनखं
लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत. अफजलखानाचा वध केलेली ती वाघ नखे आहेत शंभर टक्के खरी शिवाजी महाराजांची ती वाघ नखे आहेत म्हणून ती लंडनच्या म्युझिक मध्ये ठेवली आहे.ऑब्जेक्शन घेऊन संभ्रम निर्माण करू नये
अफजलखानाचा वध केलेलीच ती वाघनखे आहे अशी आपल्याकडे माहिती आणि रेकॉर्ड आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि मुनगंटीवार यांनी लंडन मधून नखे आण्याचा निर्णय घेतला

Loksawal News Loksawal Large Marathi news Network