मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा...
अनेक जण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर झुकल्यासारखे खुर्चीवर बसलेले असतात. त्यामुळे मानेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. परिणामी, मानदुखीचा आजार जडत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. आधुनिक जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणावर तरुणांना मानदुखी जाणवत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणारे १० पैकी २ रुग्ण हे मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे मानदुखी आणि पाठदुखीचे असतात. काहींना फिजिओथेरपीच्या साहाय्याने उपचार दिले जातात. मानदुखी टाळण्यासाठी खुर्चीवर बसण्याची शिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे.
आपण किती वेळा स्क्रीनला देतो याचे मोजमाप करण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांत मानदुखी आणि पाठदुखीच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. यासाठी नागरिकांनी नियमित योग, प्राणायाम आणि व्यायाम केला पाहिजे