महत्वाची बातमी : पाच दिवसासाठी पासपोर्टची साईट बंद असणार
एक महत्त्वाची बातमी आजपासून पासपोर्टची साईट पाच दिवसासाठी बंद असल्याची बातमी समोर आली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी दोन सप्टेंबर पर्यंत ही वेबसाईट बंद असणार आहे. काही वेबसाईट दुरुस्तीसाठी वेबसाईट बंद राहणार आहे. तांत्रिक कामांसाठी २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार आहे. या काळात हे पोर्टल नागरिकांसाठी आणि MEA/RPO/BOI/ISP/DoP/Police Authorities यांच्यासाठी बंद राहणार आहे. ३० ऑगस्टसाठी दिलेली अपाइमेंट पुढे ढकलण्यात येईल आणि अर्जदारांना यासंदर्भात कळवण्यातयेईल, असं पासपोर्ट सेवा पोर्टलकडून सांगण्यात आलं आहे.
ही नियमित चालणारी प्रक्रिया असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “अपॉइंटमेंट्सच्या तारखा बदलण्यासाठी आम्ही आधीच योजना आखून ठेवलेली असते. नागरी सेवासंदर्भातील सेवा खंडित करण्याआधी पूर्वनियोजन केलं जातं. त्यामुळे अपॉइंटमेंट्स रिशेड्युल करणं फारसं आव्हानात्मक नसेल”, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.