प्लॉट विक्रेते आरोपी यांचे जामीन अर्ज सत्र न्यायालयने फेटाळले

Sep 23, 2024 - 10:41
 0

(लोकसवाल न्यूज फुलंब्री)

 फुलंब्री येथील गट क्रमांक ३४३ मधील शेत जमिनीत औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या नावाने दोन कथित बनावट एन ए बनवून एकूण १५ खेरिदेखत दस्ताच्या नोंदणी केल्या मुळे एकूण २१ लोकांन विरुद्ध गुन्हा फुलंब्री पोलिस स्टेशन येथे कलम ४२०, ४६७, ४७१, ३४ भा. द. वी व कलम ८२,८३ नोंदणी अधिनियम १९०८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्ह्याची तक्रार फुलंब्री येथील प्रभारी दुय्यम  निबंधक पंढरीनाथ इसाई यांनी  निवासी जिल्हा अधिकारी विनोद खिरोडकर यांच्या आदेशावरून नोंद केले आहे. सदर प्रकरणात आरोपी खरेदीदार व साक्षीदार एकूण १९ लोकांना जिल्हा व सत्र न्यायालयने अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केले आहे तर मुख्य आरोपी अदनान शेख व साद फारुकी यांचे अटक पूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले आहे. खोटे एन ए बनवणे मागे कोण लोक असून त्यांच्या पर्यंत तपास पहोचेल का ? इतके मोठ्या प्रमाणे मध्ये खरदेखत दस्त नोंदण्याचा अगोदर दुय्यम निबंधक यांनी कागदपत्र का तपासले नाही असे प्रश्न उपस्थीत झाले आहे तर खरेदीदार यांच्या कडून कोणी पैसे घेतले आहे याचा सुधा तपास होणे गरजेचे आहे. सदर प्रकरणी खरेदीदार व साक्षीदार एकूण १९ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केले असून आरोपी अदनान शेख व साद फारुकी यांचे अटक पूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले आहे