दुकान वाचवायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
फुलंब्री
फुलंब्री दरी फाटा येथे दि.10/11/2024 रोजी रात्री 01.45वा राजू प्लास्टिक या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आग एवढी भीषण होती की आग लागल्यामुळे आगीचे प्रेशरने शटर बाहेर तुटून फेकले गेले .बाहेर शटर उघडण्यासाठी आलेले राजू शेख वय 25वर्षे. नितीन नागरे वय 25वर्षे. गजानन वाघ वय 30वर्षे, रा. सर्व फुलंब्री या तिघांचा शटरचे लोखंडी पार्ट लागून व होरपळून जागीच मृत्यू झाला. माहिती अशी की राजू शेख यांची राजू प्लास्टिक फुलंब्री येथील दरी फाटा वर दुकान आहे रात्री दररोज प्रमाणे ते आपली दुकान बंद करून घरी गेले असता रात्री 1.30 वाजता त्यांना फोन आला की दुकानाला आग लागली आहे राजू शेख आपली दुकानाला वाचवायला गेले असता ही घटना घडली