खामगावातील फार्मसीच्या २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठी निवड
![खामगावातील फार्मसीच्या २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठी निवड](https://www.loksawal.com/uploads/images/202502/image_870x_679d98ebf08ad.jpg)
(लोकसवाल न्यूज प्रतिनिधी शाहरुख शेख फुलंब्री)
खामगाव येथील श्री गोरक्ष कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर व सोनवणे कॉलेज ऑफ फार्मसीच्या २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदासाठी निवड केली आहे. त्यातील ८ विद्यार्थ्यांना ३ लाख तर १७ विद्याथ्यर्थ्यांना दोन लाख चाळीस हजार वार्षिक पॅकेज मिळाले असून, त्यांना राजस्थान औषधालय प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या आयुर्वेदिक कंपनीमध्ये नियुक्ती मिळाली आहे.श्री गोरक्ष कॉलेज ऑफ फार्मसी आणि संशोधन केंद्र व सोनवणे कॉलेज ऑफ फार्मसी (खामगाव) येथे ११० विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीसाठी सहभाग नोंदवला होता. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदाकरिता मुलाखत घेण्यात आली. मुंबईमधील राजस्थान औषधालय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीमा मुखर्जी आणि योगेश जामकर या निवड समितीने प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे शॉर्टलिस्ट करून अंतिम मुलाखत घेऊन जागेवर निवडलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिले. या वेळी संस्थेचे संचालक मोहन पाटील सोनवणे, सचिव अभिलाष सोनवणे, प्राचार्य वीर आणि भगवान काळे, अकबर शेख आदींनी निवड झालेल्या विद्याथ्याँचे अभिनंदन केले.