खामगांव येथील फार्मसी कॉलेज मध्ये जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्सवात साजरा

Sep 25, 2024 - 21:30
 0
खामगांव येथील फार्मसी कॉलेज मध्ये जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्सवात साजरा

(लोकसवाल न्यूज प्रतिनिधी शाहरुख शेख फुलंब्री)

फुलंब्री तालुक्यातील खामगांव येथील श्री गोरक्ष फार्मसी कॉलेज अँड  रिसर्च सेंटर येथे जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्सवात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थांना  फार्मसिस्ट दिवसाची माहिती देण्यात व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य भगवान काळे सर म्हणाले  जागतिक फार्मासिस्ट दिवस दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन' केमिस्ट किंवा फार्मासिस्टच्या आरोग्य संरक्षणातील महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं आणि लोकांना त्यांच्या कार्याची जाणीव करुन देण्यासाठी साजरा केला जातो. एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच डॉक्टरांकडे जाते आणि औषधं घेते. बरे झाल्यानंतर, तो डॉक्टरांचे आभार मानतो कारण त्यांनी त्याला बरे होण्यास मदत करणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला. पण या सगळ्यात ही जीवनदायी औषधं कोण बनवतात आणि कसं  शोधून काढतात याचा विचार कोणी करत नाही. 'फार्मासिस्ट' ही अशी व्यक्ती आहे जी औषधं तयार करुन रोगांचं निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते. वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचं कौतुक करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिस्टचं कौतुक करणे आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हा संदेशही देणं महत्वाचे आहे या प्रसंगी कॉलेजचे अध्यक्ष मोहन पाटील सोनवणे व शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती