फुलंब्री : किरकोळ वादातून युवकाचा खून

Aug 23, 2024 - 23:49
 0
फुलंब्री : किरकोळ वादातून युवकाचा खून

(लोकसवाल न्यूज नेटवर्क फुलंब्री) : फुलंब्री येथील T- point येथे टपरी चालकाचा किरकोळ वादातून शुक्रवार रोजी खून करण्यात आला या विषयी सविस्तर माहीती अशी की फुलंब्री येथील T- point येथे नजीर खान मुनीर खान वय 24 वर्ष यांचा पान टपरीचा व्यवसाय असून शुक्रवार रोजी नित्यनियमाने तो आपला व्यवसाय करत असतांना अज्ञात 8 ते 12 युवक टपरीवर समान घ्यायला आले त्या वेळी किरकोळ वाद झाला व सदरील तरुणांनी टपरी चालकांवर चाकूने छातीवर बरगाडीत व पोटात असे 3 वर केले या वेळी शेख सुलतान शेख लड्डू हा सोडवायला गेला असता त्यावर सुद्धा चाकूने वर करण्यात आला.

सदरील घटना घडल्यानंतर आरोपी पळून जात असतांना सदरील परिसरात असणाऱ्या नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले.व घटनेत जखमीना औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरानी नजीर खान मुनीर खान याला मयत घोषित केले सदरील घटनेनंतर फुलंब्री येथील t point परिसरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला या वेळी tpoint परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली घटनेनंतर फुलंब्री पोलीस ठाण्यात मोकम संख्येने जमाव जमा झाला असता पोलीस प्रशासनाने आरोपीला पकडले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.