औरंगाबाद : विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी व महायुती सरकारने आपले उमेदवार जाहिर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी सुध्दा प्रसिध्द केलेली आहे. आता ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातुन माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे. नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी जाहेर करत पक्षप्रमुख असदोद्दिन ओवैसी यांनी ट्विट सुध्दा केलेले आहे.
यापुर्वी सुध्दा नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेली होती पंरतु त्यावेळेचे शिवसेनेचे आमदार प्रदिप जैस्वाल यांनी त्यांचा पराभव केला होता. आता सुध्दा प्रदिप जैस्वाल आणि नासेर सिद्दीकी यांच्याशी लढत होणार आहे.
महायुती व महाविकास आघाडीचा फायदा होणार का ?
राज्यात शिवसेनेचे दोन गट विभागले गेले त्यात उध्दव ठाकरे गट व शिंदे गट असे आहे. हे दोन्ही गटांनी आपले विधानसभा उमेदवार घोषीत केलेले आहे. एकीकडे प्रदिप जैस्वाल तर दुसरीकडे किशनचंद तनवाणी हे उमेदवार आहे व त्यांच्या विरुध्द नासेर सिद्दीकी आहे म्हणुन या दोघांमध्ये नासेर सिद्दीकी यांना विजय मिळवता येईल का व त्यांचा त्याचा फायदा होईल का हे पाहणे महत्वाचे असेल.
याबाबत असदुद्दिन ओविसी यांनी Tweet केले आहे .