जालन्यात तलवारींचा मोठा साठा जप्त, 22 तलवारींचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेनं केलं जप्त

Aug 1, 2024 - 15:59
 0
जालन्यात तलवारींचा मोठा साठा जप्त, 22 तलवारींचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेनं केलं जप्त

जालन्यात तलवारींचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला. अमृतसरहून तलवारींचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाला तपास करताना एका पार्सलमध्ये तलवारी असल्याचं आढळून आलं आहे.

दि. 31 बुधवार रोजी 6 वा. दरम्यान तब्बल 22 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान घातपाताच्या उद्देशानं या तलवारी जालना शहरात आणल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यानुसार तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पकंज जाधव आणि त्यांच्या टिमने केली आहे. -पकंज जाधव, पोलीस निरीक्षक

Loksawal News Loksawal Large Marathi news Network