INDAPUR | इंदापुरात सापडले बॉम्ब, एक दोन नव्हे तर तब्बल 9 सुतळी बॉम्ब; सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Sep 9, 2024 - 19:07
 0
INDAPUR | इंदापुरात सापडले बॉम्ब, एक दोन नव्हे तर तब्बल 9 सुतळी बॉम्ब; सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोराकडून ताब्यात घेतलेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके,वय २३ वर्षे,राहणार कळंब तालुका  इंदापुर जिल्हा पुणे असं आरोपीचं नांव आहे. याबाबत आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वालचंदनगर पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टन आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुस्क्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती व ईद-ए-मिलाच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके रा. कळंब याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते.तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक ०१ येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी - 3 मधील खोली क्रमांक 03  मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांच्या पाथकाने त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपीला ताब्यात घेतले.

यात पोलिसांनी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन,दहा जिवंत काडतुसे (राऊंड),चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर,एक लोखंडी तलवार,दोन लोखंडी चाकु, एक मुठ नसलेले तलवारीचे पाते आणि  9 सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network