Aurangabad : ST BUS कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन, काही बस राहणार बंद

Sep 3, 2024 - 12:03
 0
Aurangabad : ST BUS कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन, काही बस राहणार बंद

 औरंगाबाद (CSN) : मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याची हमी दिली होती. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. गेल्या शनिवारी विभागीय कार्यासमोर निदर्शने आंदोलन केले होते. तसेच २ सप्टेंबरपर्यंत सरकारने दखल घेऊन निर्णय जाहीर करण्याचा अल्टिमेट दिला होता. त्याचेही पालन सरकारने केले नाही. त्यामुळे मंगळवारपासून (३ सप्टेंबर) एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. कर्मचारी  टप्प्याटप्याने धरणे आंदोलनाचे रूपांतर संपात होणार असल्याचे एसटी कामगार संयुक्त कृती समितीने कळवले.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कामगार सेना, राज्य परिवहन यांत्रिकी कामगार संघटना, परिवहन मजदूर युनियन, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, रिपब्लिकन एसटी कामगार संघटना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस आदी संघटनांची एक संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network