स्पर्शाने तुझ्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन
कवी. बद्रीनाथ पंढरीनाथ गोर्डे यांच्या स्पर्शाने तुझ्या या काव्य सग्रहाचे प्रकाशन सोहळा गांधी भवन, संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ. अनुराधा ताई चव्हाण, प्रसिध्द
गीतकार,कवी, चरित्र अभिनेते आणि कलाकार बाबासाहेब सौदागर सर तसेच त्यांच्या पत्नी सौ. कविता सौदागर तसेच गांधी स्मारक निधीचे कार्याध्यक्ष श्री. एम. एस. गोरडे शांतिनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस . के.पवार सर तसेच श्री जाधव सर सौ मंजुश्री खंडागळे, श्री बोरसे सर तसेच रसिक मान्यवरांच्या उपस्थितीत काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी कवी बद्रीनाथ गोरडे यांनी काव्यसंग्रहाबद्दलची भूमिका व्यक्त केली प्रसिद्ध कवी गीतकार लेखक श्री. बाबासाहेब सौदागर सर यांनी आपले अनुभव रसिकांसमोर सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान इंगळे यांनी केले. यावेळी रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मान्यवरांनी कवी बद्रीनाथ गोर्डे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.