बोगस NA आरोप प्रकरणात सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
फुलंब्री | शहरातील गट क्र. ३४३ मधील शेतजमिनीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दोन कथित बनावट एनए बनवून एकूण १५ खरेदीखत दस्ताच्या नोंदणी केल्यामुळे एकूण २१ लोकांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ६ संशयित आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका न्यायालयाने मंजूर केली आहे. अनिस कासम शाह, साबेर शेख, युनूस शेख, मन्सूर शेख, शाहरुख शेख, बबलू शेख यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका अॅड. आर. एस. काझी यांच्यामार्फत दखल केली होती. सदर प्रकरणात मूळ एफआयआर चुकीचा असून सदर गुन्हा प्रथमदर्शनी खरेदीदार यांच्याविरुद्ध सिद्ध होत नाही तसेच खरेदीदार किंवा साक्षीदार यांनी कोणत्याही प्रकारे फसवणूक तसेच आर्थिक लाभ घेण्याचा दुष्ट हेतूने कोणतेही कृत्य व कथित बनावट एनए दस्तऐवज केलेले नसल्याचे सांगितले.