शरद पवार यांनी त्यांच्या काळात मराठा आरक्षणासाठी एकही काम केले नाही- राधाकृष्ण विखे पाटील

ते वैफल्यातून अमित शहांवर टीका करत आहेत

Jul 27, 2024 - 13:03
 0
शरद पवार यांनी त्यांच्या काळात मराठा आरक्षणासाठी एकही काम केले नाही- राधाकृष्ण विखे पाटील

ऑन कांदा निर्यात फटका

- यांच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत 
- निर्यात मूल्य कमी झाले पाहिजे असा एक आहे
- कांदा व्यापाऱ्यांनी शेतकाऱ्यांना वेठीस धरले आहे 
- 5 लाख मेट्रिक कांदा निर्यात करायचा आहे, पण सद्य स्थितीत कांदा मिळत नाही 
- शेतकऱ्यांकडे कितीतरी कांदा उपलब्ध आहे, हे देखील पाहायला हवे
- निर्यात मूल्य कमी झाले पाहिजे, अधिक कांदा निर्यात झाला पाहिजे 
- मी स्वतः पियुष गोयल यांना विनंती केली आहे की लवकरच त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे

ऑन शरद पवार अमित शाह टीका

- ते वैफल्यातून अमित शहांवर टीका करत आहेत 
- शरद पवार जेष्ठ आहेत, त्यांनी अशी टीका करणे योग्य नाही
- एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते 
- मग हेच राजकारण करत बसायचं का ? 
- कलम ३७० हटले यापूर्वी कधी असे झाले नाही 

ऑन ठाकरे वाढदिवस

- जुने मित्र आहेत त्यांना शुभेच्छा 
- वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्या बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे 
- राज्यात बरेच मुख्यमंत्री होऊ लागले आहेत 
- काँग्रेसचे वेगळे मुख्यमंत्री, उबाठाचे वेगळे, राष्ट्रवादीचे वेगळे आहेत असे बरेच मुख्यमंत्री आहेत
- राज्याची जनता ठरवेल, राज्यात महायुतीचा सरकार येणार महायुतीचाच मुख्यमंत्री होणार
- लोकसभेला वेगळी परिस्थिती मात्र विधानसभेला महायुतीचेच सरकार येईल 

ऑन लाडकी बहीण निधी

- राज्यसरकारकडे निधीची चिंता नाही 
- जनतेच्या लोकाभिमुख योजनांसाठी निधीची चिंता नाही
- येणाऱ्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आलेले दिसतील

ऑन मराठा आंदोलक आणि शरद पवार बैठक

- शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आहे 
- त्यांनी त्या काळात मराठा आरक्षणासाठी एकही काम केले नाही 
- मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी काय केलं ? हे त्यांनी सांगावे
- लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची 

ऑन संजय राऊत 

- मी याच ठिकाणी बोललो होतो संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
- मूर्ख लोकांच्या प्रतिक्रियेवर न बोलणं चांगले आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network