विशेष कुलमुखत्यारपत्रा बाबत काही महत्वाची माहिती

Jul 25, 2024 - 17:30
 0
विशेष कुलमुखत्यारपत्रा बाबत काही महत्वाची माहिती

विषयाचा संक्षिप्त तपशील

एखाद्या व्यक्तीने निष्पादित केलेला दस्त त्याचे वतीने दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीस हजर करणे किंवा त्या निष्पादनाचा कबुलीजबाब देणे, याकरिता द्यावयाचे विशेष कुलमुखत्यारपत्र नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 33 अन्वये अधिप्रमाणित करुन देणे.

लागणारी आवश्यक कागदपत्रे :

1. विशेष कुलमुखत्यारपत्र

2. कुलमुखत्यारपत्र देणाèया व्यक्तीचा ओळख व रहिवास पुरावा

3. कुलमुखत्यारपत्र देणार व्यक्तीचे ओळख पुरावा.

कोणत्या अधिनियमाचे /  नियमाचे आधारे सदर  काम केले जाते?

नोंदणी अधिनियम, १९०८ कलम ३३ व महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ नियमा आधारे काम केले जाते. विहित कालावधीमध्ये संबधित दुय्यम निबंधक अधिप्रमाणनाची कार्यवाही न झाल्यास त्याबाबतची कारणे लेखी स्वरुपात देण्यास जबाबदारी  हि संबधित दुय्यम निबंधक अधिकारी यांची असते. या प्रक्रियेबाबत ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी-संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक हे असतात.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network