मुस्लीमांच्या भावना दुखावल्या प्रकरणी रामगीरी महाराज विरुध्द कार्यवाहीसाठी औरंगाबाद येथे लोकशाही मार्गाने उपोषण

Aug 19, 2024 - 15:50
 0
मुस्लीमांच्या भावना दुखावल्या प्रकरणी रामगीरी महाराज विरुध्द कार्यवाहीसाठी औरंगाबाद  येथे लोकशाही मार्गाने उपोषण

औरंगाबाद (CSN) : रामगीरी महाराज विरुध्द अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे त्याचे मात्र कारणे असे की, पैगंबर मोहम्मद सल. यांच्या संदर्भात आक्षेपार्य विधान केल्याप्रकरणी  कार्यवाहीची मांगणी होत आहे. त्या संदर्भात समाजसेवक साहेब खा यांनी उपोषणाचा मार्ग घेतला आहे. रामगीरी महाराजांवर गुन्हे दाखल करुन त्वरीत अटक करावी तसेच त्यांना तडीपार हि करण्यात यावे अशी मागणी साहेब खा यांनी केलेली आहे. 

दिनांक १९ ऑगस्ट रोजी पासुन या उपोषणाला विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद समोर लोकशाही मार्गाने  सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रेसनोट द्वारे कळविलेल आहे. तरी सदरील उपोषण हा  शांतीपूर्ण  मार्गाने होईल असं हि ते म्हणाले.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network