मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे मध्ये अगोदर आरोप -प्रत्यारोप नंतर दिल जमाई
मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या नवीन फोटोसेशन नंतर चर्चांना उधाण आलाय
औरंगाबादचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि जालना चे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर चांगलीच तक्रार बघायला मिळाली. रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाला अब्दुल सत्तार कारणीभूत असल्याचे सांगितलं. तर येणाऱ्या विधानसभेत अब्दुल सत्तार यांना पराभूत करू असं हे रावसाहेब दानवे म्हणाले.
यादरम्यान औरंगाबाद विमानतळावर मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची भेट झाली. रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांचे एकत्र फोटोही काढण्यात आले. लोकसभानंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले असताना आता मात्र दोघांचे एकत्र फोटो पाहून चर्चांना उधाण आलय. फोटो पाहून बोलले जात आहे की आता रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे.