खुन करुन पळुन जाणार्याला आरोपीला पोलिसांनी पकडले
(लोकसवाल न्यूज फुलंब्री)
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथे झालेल्या खून प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला गुन्हा उघडकिस करून आरोपी आकाश कौतिक खंडाळे रा पिंपळगाव वळण तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद याला पकडले. सदर ही घटना अशी आहे की, फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथे काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मदन रावण बिघोत या व्यक्तीला मारण्यात आले. तर मदन रावण बिघोत रा डोंगरगाव शिव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद याचा जागीच मृत्यु झाला.तर आरोपी आकाश कौतिक खंडाळे रा पिंपळगाव वळण तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद याच्यावर गु.र.न. ४३२/२०२४ कलम १०३ बी.एन.एस. हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी खुलताबाद मार्गी भुसावळ कडे जात असताना खुलताबाद जवळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर कारवाई ही औरंगाबाद पोलिस अधीक्षक ग्रामीण विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सतीश वाघ पोहेका सुनील खरात, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, नरेंद्र खंदारे, शेख कासम, संतोष पाटील, दीपक सुरवसे, राहुल गायकवाड, आनंद घाटेश्वर योगेश तरमाळे तसेच पोलीस ठाणे फुलंब्री येथील संतोष डोंगरे यांनी कामगिरी बजावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.