आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पारदर्शक; गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पारदर्शक; गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

Feb 5, 2025 - 19:03
 0
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पारदर्शक;  गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

AURANGABAD : छत्रपती संभाजीनगर, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. यानियमान्वये होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक व मानवी हस्तक्षेपाशिवाय होतात. त्यामुळे यासंदर्भात कुणी प्रलोभन दिल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

 

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पद्धतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.यामध्ये कोणत्याही प्रकरचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी केले आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी महानगरपालिका, नगरपालिका संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे depmh2@gmail.com आयुक्त शिक्षण पुणे educommoffice@gmail.com यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी. यासंदर्भात  कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालाय शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network